Sunday 21 August 2016

कोणीतरी हवं ..



कोणीतरी हवं,
आपल म्हणून म्हणणारं ..
मनातील भावनांना,
हळुवारपणे जपणारं ..

उगाच लाडात येऊन,
गोडं गोडं बोलताना..
वेळ आली तर मात्रं,
चांगलंच सुनावणारं ..
कोणीतरी हवं ..

'मी' पणाचा आव आणून,
अकारण चिडताना ..
त्यानंतर खोटी खोटी,
माफी सुद्धा मागणारं ..
कोणीतरी हवं ..

प्रेमाचा रंग,
डोळ्यात साठवताना..
नात्याचा गंध,
श्वासात भरणारं ..
कोणीतरी हवं ..

उत्कट टपोऱ्या क्षणांना,
आठवणीत वेचताना ..
विश्वासाचे धागेही,
अलगद गुंफणारं ..
कोणीतरी हवं ..

नात्यांचे पदर,
उलगडून दाखवतांना ..
आधाराची शालही,
घट्ट गुंडाळणारं ..
कोणीतरी हवं ..

कोणीतरी हवच,
आपल म्हणून म्हणणारं ..
मनातील भावनांना,
हळुवारपणे जपणारं .. 

2 comments:

  1. छानच लिहिली आहेस कविता ! .. लिखते रहो और सुनाते रहो ।
    खूप खूप शुभेच्छा !

    ReplyDelete